Payal Naik
छोट्या द्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान नुकतीच 'वीण दोघातली ही तुटेना' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलीये.
मात्र तिच्या वैयक्तिक आयुष्याची कायमच चर्चा होत असते. तिचा किसिंग सीनदेखील प्रचंड गाजला होता.
तिने 'बबलू बॅचलर' या चित्रपटात शरमन जोशीसोबत काम केलं होतं. या चित्रपटात त्यांनी एक केसिंग सीन दिला होता.
या किसिंग सीनमुळे ती प्रचंड ट्रोल झाली होती. मात्र एका मुलाखतीत तिने या सीनसाठी सुरुवातीला आपण तयार नसल्याचं सांगितलं होतं.
तिने सिनेब्लीट्सला मुलाखत दिली होती, यात बोलताना ती म्हणालेली, 'सुरुवातीला मला स्वतःलाच या किसिंग सीनसाठी तयार होण्यासाठी कष्ट घ्यावे लागलेत.'
मीच या सीनसाठी कशी तयार झालीये हे मला ठाऊक आहे. जेव्हा मी या सिनेमाची पटकथा वाचली तेव्हा लक्षात आलं की हा सीन सिनेमासाठी गजरेचा आहे.
फक्त प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी आम्ही ते केलेलं नव्हतं. त्याच्या सोबत सीन करताना त्याने मला खूप सांभाळून घेतलं.
किसिंग सीनच्या बाबतीत मराठी आणि बॉलिवूडमध्ये फरक करू नये. तुम्ही मुळात व्यावसायिक असायला हवं.
डोन्ट जज अ बुक बाय इट्स कव्हर असं उत्तर देत तिने या विषयावर उत्तर दिलं होतं.
डोंबिवलीच्या 'या' शाळेत शिकली आहे तेजश्री प्रधान