Payal Naik
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलं.
तिच्या दिसण्याचे आणि हसण्याचे अनेक चाहते आहेत. तेजश्री शेवटची स्टार प्रवाहवरील 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत दिसली होती.
मात्र काही महिन्यांपूर्वीच तिने या मालिकेचा निरोप घेतला.
तिच्या जाण्याने तिचे चाहते नाराज झाले होते. मात्र आता तेजश्री पुन्हा एकदा स्टार प्रवाह वर दिसणार आहे.
स्वतः माधुरी दीक्षितने ही घोषणा केलीये.
माधुरीची निर्मिती असणारा 'पंचक' हा मराठी सिनेमा लवकरच स्टार प्रवाहवर पाहता येणार आहे.
या चित्रपटात आदिनाथ कोठारेसोबत तेजश्री प्रधानची महत्वाची भूमिका आहे.
पुढील महिन्यात १३ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता हा सिनेमा स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणार आहे.
माधुरी अलीकडेच या वाहिनीच्या पुरस्कार सोहळ्यात सहभागी झालेली, तेव्हा या चित्रपटाच्या प्रीमीयरविषयी तिने घोषणा केली.
का झालेला तेजश्री प्रधानचा घटस्फोट? शशांकने केलेले गंभीर आरोप