ऐकून आश्चर्य वाटेल, दहशतवादी 'ओसामा बिन लादेन' होता 'अलका याग्निक'यांच्या गाण्यांचा चाहता

सकाळ वृत्तसेवा

दहशतवादी

तुम्हाला सांगितलं की जगातला सर्वात भयानक दहशतवादीसुद्धा बॉलीवूड गाण्यांचा चाहता होता, तर कदाचित तुम्हाला हे ऐकून थोडं आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे.

Terrorist | Sakal

ओसामा बिन लादेन

खूंखार दहशतवादी ओसामा बिन लादेन याला वर्ष 2011 मध्ये अमेरिकेच्या नेवी सील्स या विशेष सैन्य दलाने एका गुप्त ऑपरेशनमध्ये ठार केलं होतं.

Osama bin Laden | Sakal

कंप्युटर

वर्ष 2011 मध्ये जेव्हा अमेरिकेच्या नेवी सील्सने पाकिस्तानमधील एबटाबाद शहरात ओसामा बिन लादेनच्या घरावर छापा टाकला, तेव्हा तिथून एक कंप्युटर जप्त केला गेला होता.

Computer | Sakal

बॉलीवूड गाणी

त्या वेळी त्याच्या संगणकातून उदित नारायण, कुमार सानू आणि अलका याग्निक यांची गाणी सापडली होती. पण त्यामध्ये सर्वाधिक गाणी अलका याग्निक यांची होती.

Bollywood Songs | Sakal

अलका याग्निक

ओसामा बिन लादेनला भारतीय गाणी खूप आवडायची. संपूर्ण जगाला आपल्या दहशतीने थरथरवणारा ओसामा बिन लादेन भारतीय गायिका अलका याग्निक यांच्या आवाजावर फिदा होता.

Alka Yagnik | Sakal

१०० रेकॉर्डिंग

त्याला त्यांच्या गाण्यांची इतकी आवड होती की त्याच्या संगणकात अलका याग्निक यांच्या १०० पेक्षा जास्त गाण्यांची रेकॉर्डिंग आढळली होती.

100 Recordings | Sakal

‘प्यार तो होना ही था’

त्या रेकॉर्डिंगमध्ये ‘प्यार तो होना ही था’, ‘अजनबी मुझको इतना बता’ आणि ‘जाने तमन्ना’ अशा गाण्यांचा समावेश होता. यावरून असं स्पष्ट होतं की ओसामा बिन लादेनला बॉलीवूड गाणी ऐकायला फारच आवडायची.

‘Pyar To Hona Hi Tha’ | Sakal

"यात माझी काय चूक आहे?"

अलका याग्निक यांनी एका मुलाखतीत यावर प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी म्हटलं होतं, "यात माझी काय चूक आहे? त्याच्या आत एक छोटा कलाकार नक्कीच लपलेला असावा. जर त्याला गाणी आवडत असतील, तर ती एक चांगली गोष्टच होती.

Alka Yagnik | Sakal

मराठ्यांची हरवलेली पिढी, बलुचिस्तानातले मराठा नेमके आहेत तरी कोण?

The Forgotten Marathas of Balochistan | Sakal
येथ क्लिक करा