'कल्की' जन्म झाला; जगातली सर्वात शक्तिशाली कुंडली मिळाली

संतोष कानडे

भगवान विष्णू

भगवान विष्णूंचा दहावा अवतार म्हणजे कल्की अवतार असेल, असं हिंदू पुराणामध्ये म्हटलेलं आहे

पाप

जगामध्ये वाढलेलं पाप आणि पापी लोकांना नष्ट करण्यासाठी कल्की अवतार असेल, असं सांगितलं जातं

कल्की

कल्की जन्मानंतर कलियुगाचा अंत होईल आणि पुन्हा सत्ययुगाची सुरुवात होईल, अशी श्रद्धा आहे

ज्योतिष

देशातल्या नावाजलेल्या ज्योतिषांपैकी एक असलेल्या सुशीलकुमार सिंग यांनी कल्की जन्माबाबत भाष्य केलं आहे

सुशीलकुमार

काही ज्योतिषांना कल्की जन्माची खात्री पटल्याचं सुशीलकुमार सांगतात. त्यांना जी कुंडली मिळाली आहे ती जगातील सर्वात शक्तीशाली कुंडली असल्याचं ते म्हणतात.

चॅनेल

डिजिटल जॉकी या युट्यूब चॅनेलच्या मुलाखतीमध्ये सिंग यांनी याबाबत माहिती दिली आहे

कुंडली

ही कथित कुंडली ईश्वराची कुंडली असून ती प्रभू रामापेक्षाही प्रभावी कुंडली असल्याचा दावा असल्याचं सांगण्यात येतंय

कलियुग

साधारण २०४० मध्ये कलियुग संपेल, असा दावा आहे. पाच हजार वर्षांचं एक युग असतं. कलियुग संपल्यानंतर सत्ययुग सुरु होईल

संस्कृती

एखादं युग संपताना संस्कृती नष्ट होते, धरती संपते आणि अधर्माचा नाश होतो, अशी श्रद्धा आहे

अंत

कल्की जन्मानंतर कलीचा अंत होईल आणि एका नव्या युगाची सुरुवात होईल, असा दावा आहे. मात्र कल्की जन्माबाबत मिळालेली माहिती कथित स्वरुपातील आहे.