Anuradha Vipat
अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’ असा एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली.
या चित्रपटामध्ये तगडी स्टारकास्ट बघायला मिळणार आहे. आता नुकतेच या चित्रपटातील पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
अभिनेत्री मुक्ता बर्वेने या गाण्याचा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
‘थोडा टाईट थोडा लूज साला कॅरॅक्टर’ असे या गाण्याचे बोल आहेत.
शालमली खोलगडेने हे गाणे गायले आहे. तर वैभव जोशी यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत.