Aarti Badade
अनेक फळं फायबरचा उत्कृष्ट स्रोत असतात.फळांमधील फायबर पचन क्रिया सुधारते, पोटाचा कार्य सुरळीत ठेवतो.यामुळे बद्धकोष्ठता आणि मुळव्याध कमी होतात.
फळांमध्ये फ्लेवोनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे चरबी आणि ट्रायग्लिसराइड्स साचू देत नाही.कलिंगड, पपई, टरबूज, सफरचंद यांसारख्या फळांमध्ये फायबर असल्याने पोट भरलेलं राहतं, आणि भूक कमी लागते.
फळांमधील फ्लेवोनॉइड्स आणि पॉलीफेनॉल्स रक्ताभिसरण सुधारतात.यामुळे त्वचेतील कोलेजन बूस्ट होतो आणि त्वचा स्वच्छ आणि ताजीतवानी राहते.फळांमधील विटामिन्स केस गळती कमी करतात आणि केस लांब होतात.
फळांमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात.यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि बॅक्टेरियाच्या संसर्गाची शक्यता कमी होते.
फळांमध्ये पाणी आणि अँटीऑक्सिडंट्सचा मोठा प्रमाण असतो, जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकायला मदत करतात.फळांमधील फायबरमुळे पोट साफ होतं, आणि मल्टिन्यूट्रियन्ट्समुळे किडनी, लिवर आणि आतड्यांच्या समस्या दूर होतात.
फळांमधील पोटॅशियम हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका कमी करतो.रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो, आणि फॉलेसमुळे लाल रक्तपेशी वाढतात.
हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात त्या त्या ऋतूतील फळांचा समावेश करा.आपल्या आहारात दररोज किमान एक फळ खा आणि निरोगी राहा!