Indian Cobra: जरा जपून, या विषारी सापांपासून चार नाही आठ हात लांबचं राहा

सकाळ डिजिटल टीम

इंडियन किंग कोब्रा (Indian King Cobra):

भारतात आढळणाऱ्या सर्वात विषारी सापांपैकी एक. नागपंचमीच्या दिवशी या नागाला पुजलं जातं. या नागाला इश्वराचं प्रतिकही मानलं जातं आणि हा चावला तर इश्वर साक्षात दिसूही शकतो.

Indian Cobra | Esakal

मण्यार (Common Crait Snake):

भारत, बांगलादेश आणि पाकिस्तानात मण्यार सापाच्या सर्पदंशामुळे सर्वाधिक लोक मरण पावतात. या सापाच्या विषात बिटा-बुंगॅलोटॉक्झिन, प्रिसिनॅप्टिक न्युरोटॉक्झिन आढळते, ज्यामुळे पॅरालिसिस होऊन माणुस मृत्यूमुखी पडतो.

Indian Crait snake | Esakal

फुरसे (Erachis Caranitus):

फुरसे हा साप चावा घेतल्यावर १२ मिलीग्राम विष सोडतो, पण एका माणसाला मरणाच्या दारात पोहोचवण्यासाठी ५ मिलीग्राम विष पुरेसं आहे.

Erachis caranitus | Esakal

हॉर्न्ड पिट व्हायपर (Horned Pit Viper)

हा साप घोणस प्रजातीतील साप असून प्रामुख्याने वाळवंटात आढळतो. त्याचा रंग आणि लपण्याची शैली अतिशय चांगली आहे, ज्यामुळे तो उघड्या डोळ्यांनी दिसणं कठीण आहे. तो वाळूच्या आत लपतो.

Horned Pit Viper | Esakal

हिरवा चापडा (Maya's Pit Viper)

सापाची ही प्रजाती नुकतीच भारताच्या उमरोली मिलिटरी स्टेशन या ठिकाणी सापडली होती. या सापाचे नामकरण भारातीय सेनेमधील अधिकाऱ्याच्या दिवंगत आईच्या नावावर देण्यात आलंय.

Maya's Pit Viper | Esakal

ब्लॅक कोब्रा (Black Cobra )

या सापाचं नाव ऐकलं नाही, असा माणूस शोधून सापडणार नाही. या प्रजातीचे काही साप स्प्रिटिंग कोब्रा म्हणून देखील ओळखले जातात. त्यांचे विष १ मीटरपर्यंत पोहोचू शकते.

Black Cobra | Esakal

घोणस (Russell's Viper)

या सापाचे विष रक्ताच्या गाठी तयार करतं आणि तेथील प्रथिनांचा नाश करतं.नाकातोंड आणि गुदद्वारामधून रक्त येतं. त्यामुळे हा साप चावल्यानंतर त्या ठिकाणी पट्टी बांधू नका, नाहीतर तो भाग कायमचा निकामी होऊ शकतो.

Pit Viper | Esakal