सकाळ डिजिटल टीम
जगात असे अनेक पक्षी आहेत, ज्यांना पंख आहेत; पण ते उडू शकत नाहीत. अशा 6 पक्ष्यांबद्दल सविस्तर जाणून घेऊया..
शहामृग हा जगातील सर्वात मोठा पक्षी मानला जातो. ज्याचं अंडं देखील सर्वात मोठं असतं. या पक्ष्याचे पंख त्याच्या शरीराच्या तुलनेत खूपच लहान आहेत, ज्यामुळे तो आकाशात उडू शकत नाही.
अंटार्क्टिका बेटावर आढळणारे पेंग्विन नावाचे पक्षी देखील उडू शकत नाहीत, कारण त्यांचे पंख खूप लहान असतात, जे उडण्यासाठी योग्य नसतात.
इमू हा एक ऑस्ट्रेलियन पक्षी आहे, जो आकाराने खूप मोठा आहे. शहामृगानंतर हा दुसरा सर्वात मोठा पक्षी मानला जातो. त्याच्या जड शरीरामुळे आणि लहान पंखांमुळे ते उडू शकत नाहीत.
काकापो हा न्यूझीलंडमध्ये आढळणारा पोपटासारखा दिसणारा पक्षी आहे. हा पक्षी खूपच दुर्मिळ आहे. त्याचे पंख खूप लहान आहेत, ज्यामुळे तो उडू शकत नाही.
ताका हा पक्षी आहे, पण तो उडू शकत नाही. हे पक्षी न्यूझीलंडच्या दक्षिण बेटावर आढळतात.
नॉर्दर्न कॅसोवरी पक्ष्याची मान सोनेरी असते आणि ती खूपच आकर्षक दिसते. हे पक्षी पंख असूनही उडू शकत नाहीत.