ब्लूबेरी खाण्याचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?

Monika Lonkar –Kumbhar

ब्लूबेरी

ब्लूबेरीमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर्स आणि पोटॅशिअमचे मुबलक प्रमाण आढळून येते.

ब्लूबेरी खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात.

संशोधकांच्या मते, दररोज ब्लूबेरी खाल्ल्याने तुमचे आरोग्य तर चांगले राहतेच परंतु, त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्याची चमकही दीर्घकाळ टिकते.

वजन कमी करण्यासाठी लाभदायी

ब्लूबेरीचे सेवन केल्याने पोटातील अतिरिक्त चरबी आणि कॉलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते.

मेंदूच्या विकासात मदत करते

ब्लूबेरीमध्ये आढळून येणारी जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायटो न्यूट्रिएंट्स मेंदूच्या पेशींचे संरक्षण करतात. त्यामुळे, मेंदूच्या विकासात मदत होते.

हृदयासाठी फायदेशीर

ब्लूबेरीमध्ये असलेले फायबर अँथोसायनिन, पोटॅशिअम, व्हिटॅमिन बी6 आणि व्हिटॅमिन सी आढळते. जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

कर्करूग्णांसाठी लाभदायी

कर्करोगाच्या रुग्णांसाठी ब्लूबेरी अतिशय फायदेशीर आहे. यामध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट्स कर्करोगासारख्या धोकादायक आजारांना प्रतिबंध करण्यास मदत करतात.

चेहऱ्यावर चमक हवी आहे? ग्रीन टी आहे मदतीला..!

Green Tea Facepack | esakal