रक्तदाब नियंत्रित ठेवण्यापासून ते उर्जा वाढवण्यापर्यंत, तांदळाचे पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

Monika Lonkar –Kumbhar

भात

आपल्या भारतीय स्वयंपाकघरात नेहमीच शिजवला जाणारा गरमागरम भात हा आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे? हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. 

Rice Water Benefits

शिजवलेल्या भाताचे पाणी

मात्र, तुम्हाला हे माहित आहे का की, शिजवलेल्या भाताचे पाणी देखील तितकेच हेल्दी आहे. या शिजवलेल्या तांदळाचे पाणी पिण्याचे अनेक फायदे आपल्या आरोग्याला होतात.

Rice Water Benefits

तांदूळ शिजवून झाल्यानंतर जेव्हा भात काढून घेतला जातो, तेव्हा त्यामधील पाणी फेकून न देता ते पिण्यासाठी वापरावे. हे पाणी प्यायल्यामुळे आपल्या शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. कारण, या पाण्यात कार्बोहायड्रेट्सचे विपुल प्रमाण आढळून येते. या तांदळाच्या पाण्याचे इतर आरोग्यदायी फायदे कोणते? ते जाणून घेऊयात.

Rice Water Benefits

शरीर हायड्रेटेड ठेवते

सध्या देशातील काही भागांमध्ये थंडी जाणवत असली तरी देखील काही भागांमध्ये तापमान आतापासूनच वाढले आहे. जणू काही उन्हाळ्याला सुरूवात झाल्यासारखे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे, या दिवसांमध्ये शरीराचे डिहायड्रेशन टाळण्यासाठी तुम्ही तांदळाच्या पाण्याची मदत घेऊ शकता.

Rice Water Benefits

शरीराचे होणारे डिहायड्रेशन रोखण्यासाठी तुम्ही तांदळाचे पाणी पिऊ शकता. हे पाणी प्यायल्यामुळे शरीराचे योग्य संतुलन राखले जाते, आणि शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढली जाते. 

Rice Water Benefits

रक्तदाब नियंत्रित करते

अनेक उपाय करूनही जर तुमचा रक्तदाब नियंत्रणात येत नसेल तर, तुम्ही तांदळाचे पाणी पिणे फायद्याचे ठरू शकते. या तांदळाच्या पाण्यामध्ये सोडिअमचे प्रमाण ही कमी असते, त्यामुळे, हे पाणी प्यायल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते.

Rice Water Benefits

शरीराला मिळते ऊर्जा

कर्बोदकांनी समृद्ध असलेले हे तांदळाचे पाणी प्यायल्यामुळे तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. त्यामुळे, तुम्हाला लगेच फार भूक लागत नाही. हे पाणी प्यायल्यामुळे शरीराला भरपूर ऊर्जा तर मिळतेच आणि वजन कमी करण्यातही मदत होते.

Rice Water Benefits

पूजा सावंतच्या लग्नात मृण्मयी दिसली खास अंदाजात

mrunmayee deshpande | esakal