निरोगी हृदयासाठी आणि मेंदूसाठी डार्क चॉकलेट खाणे आहे फायदेशीर

Monika Lonkar –Kumbhar

डार्क चॉकलेट

चॉकलेट खायला कुणाला आवडत नाही, ते तर सगळ्यांनाच आवडतं. लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वांना चॉकलेट्स खायला आवडतात. त्यातल्या त्यात डार्क चॉकलेट खाणारे अनेक जण आहेत.

dark chocolate

डार्क चॉकलेट हे आपला मेंदू तिक्ष्ण आणि निरोगी ठेवण्यासाठी लाभदायी आहे.

dark chocolate

डार्क चॉकलेटमुळे आपले हृदय निरोगी राहण्यास मदत मिळते. त्यामुळे, हृदयाची आणि मेंदूची काळजी घ्यायची असेल तर डार्क चॉकलेटचे जरूर सेवन करा. मात्र, डार्क चॉकलेटचे सेवन प्रमाणात करणे महत्वाचे आहे. 

dark chocolate

डार्क चॉकलेट खाणं हे आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर असतं. मात्र, एका नवीन संशोधनातून असे दिसून आले आह की, डार्क चॉकलेट हे आपला मेंदू तिक्ष्ण आणि निरोगी ठेवण्यासाठी लाभदायी आहे.

dark chocolate

तणावाचे प्रमाण कमी करते

डार्क चॉकलेटमध्ये कॅफेनचा समावेश असतो. या कॅफेनमुळे आपला तणाव कमी होण्यास मदत होते. तणाव कमी करण्यासाठी कॅफेन प्रभावी आहे. डार्क चॉकलेटचे सेवन केल्यामुळे आपला मूड देखील सुधारू शकतो.

dark chocolate

शिवाय, डार्क चॉकलेटमध्ये आढळणारे घटक तणाव निर्माण करणारे हार्मोन्स नियंत्रित करण्याचे काम करतात. त्यामुळे, तणाव कमी करण्यासाठी डार्क चॉकलेट फायदेशीर आहे.

dark chocolate

त्वचेसाठी फायदेशीर

डार्क चॉकलेटचे सेवन करणे हे आपल्या शरीरासाठी आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. डार्क चॉकलेटमध्ये आढळून येणाऱ्या डायट्री फ्लेवनॉल्समुळे आपल्या शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते आणि त्वचेची रक्ताभिसरणाची प्रक्रिया देखील सुधारते. 

dark chocolate

‘चॉकलेट डे’ च्या निमित्ताने 'या' खास पद्धतीने जिंका तुमच्या जोडीदाराचे मन