भिजवलेले शेंगदाणे आरोग्यासाठी आहेत लाभदायी, जाणून घ्या फायदे

Monika Lonkar –Kumbhar

मॉर्निंग रूटीन

प्रत्येकाचे मॉर्निंग रूटीन हे वेगवेगळ्या प्रकारचे असते. कुणाला सकाळची सुरूवात ही भिजवलेले ड्रायफ्रूट्स खाऊन करायला आवडते, तर कुणाला मोड आलेल्या कडधान्यांचे सॅलेड खायला आवडते. 

health care

हेल्दी ड्रिंक्स, फळे किंवा ग्रीन टी यांचे सेवन करून काहींची सकाळ होते.

health care

शेंगदाणे

शेंगदाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पौष्टिक घटकांचा समावेश आढळून येतो. स्वयंपाक घरात अनेक भाज्यांमध्ये, विविध प्रकारच्या रेसिपीजमध्ये शेंगदाण्यांचा वापर आपण करतो.

health care

इतकचं काय, शेंगदाण्याचे लाडू देखील बनवले जातात. परंतु, तुम्हाला हे माहित आहे का? भिजवलेले शेंगदाणे खाण्याचे अनेक फायदे आपल्या आरोग्याला होतात. 

health care

गॅस आणि अ‍ॅसिडिटीपासून मिळतो आराम

शेंगदाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह, मॅंगनिज, कॉपर, कॅल्शिअम आणि सेलेनियम सारखे घटक आढळून येतात. त्यामुळे, रिकाम्या पोटी भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने गॅस आणि अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळण्यास मदत होते.

health care

ज्या लोकांना गॅस आणि अ‍ॅसिडिटीच्या समस्येचा नेहमी त्रास होतो, अशा लोकांनी आवर्जून रात्री झोपताना १०-१२ शेंगदाणे पाण्यात भिजत घालावेत. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी या शेंगदाण्यांचे सेवन करावे.

health care

पाठीचे दुखणे होते कमी

ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे, अशा लोकांनी पाठदुखीवर आराम मिळवण्यासाठी नियमितपणे भिजवलेल्या शेंगदाण्यांसोबत गुळाचे सेवन अवश्य करायला हवे. 

health care

हिवाळ्यातील सुपरफूड आहे हिरवे मूग, जाणून घ्या 'हे' आरोग्यदायी फायदे

benefits of green moong