Saisimran Ghashi
मेंदूचा आजार आणि पॅरालिसिसचा झटका येण्यास काही खास पदार्थ कारणीभूत ठरतात
या पदार्थांचा अतिवापर मेंदूच्या आरोग्यावर परिणाम करतात आणि पॅरालिसिसचा धोका वाढवतात.
सॅच्युरेटेड फॅट्स जास्त प्रमाणात खाल्ल्याने रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊन मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो.
जास्त साखर खाल्ल्याने रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊन पॅरालिसिसचा धोका वाढतो.
सॅच्युरेटेड फॅट्समुळे रक्तवाहिन्या कडक होतात, ज्यामुळे मेंदूत रक्तस्त्राव किंवा रक्तपुरवठा खंडित होऊ शकतो.
साखर आणि चरबीमुळे उच्च रक्तदाब वाढतो, जे मेंदूच्या आजारांचे आणि पॅरालिसिसचे प्रमुख कारण आहे.
सॅच्युरेटेड फॅट्समुळे बॅड कोलेस्ट्रॉल वाढते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या तयार होऊन स्ट्रोक होतो.
तेलकट, तुपकट पदार्थ आणि फास्ट फूडमध्ये सॅच्युरेटेड फॅट्स आणि साखर जास्त असते, जे मेंदूच्या आरोग्यास हानीकारक आहे.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.