हृदय निरोगी ठेवायचं असेल तर, 'या' ज्यूसचा आहारात करा समावेश!

Aishwarya Musale

तुम्हाला माहित आहे का की हृदयविकार हे जगातील मृत्यूचे प्रमुख कारण आहे? होय, हृदयविकाराच्या झटक्याची प्रकरणे दररोज समोर येत आहेत. हे वृद्धांबरोबरच तरुणांमध्येही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

खरं तर, वाईट खाण्याच्या सवयी आणि चुकीच्या जीवनशैलीचा आपल्या हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो. आज आम्ही तुम्हाला अशाच ज्यूसबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे हृदयाच्या आरोग्याला फायदा होतो.

बीटरूटचा रस

तुमचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही बीटरूटचा रस पिऊ शकता. बीटरूटमध्ये नायट्रेटचे प्रमाण जास्त असते, जे उच्च रक्तदाबावर उपचार करते आणि रक्त प्रवाह सुधारण्यास मदत करते. हाय बीपीमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.

हिरव्या पालेभाज्यांचा रस

हिरव्या पालेभाज्यांचा रस देखील हृदयासाठी फायदेशीर ठरू शकतो. तुम्ही पालक आणि स्विस चार्ड यांचा रस पिऊ शकता. हे जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे.

ज्यामुळे रक्तवाहिन्यांमधील जळजळ कमी होते आणि ब्लड सर्कुलेशन सुधारते. हिरव्या पालेभाज्यांच्या रसामध्ये व्हिटॅमिन के असते जे रक्त पातळ करते.

लिंबूवर्गीय फळांचा रस

तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात किवी, संत्रा यांसारख्या लिंबूवर्गीय फळांच्या रसाने देखील करू शकता, जे व्हिटॅमिन सी आणि फ्लेव्होनॉइड्सने समृद्ध आहेत, जे कोलेस्टेरॉलची पातळी कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारतात.

डाळिंबाचा रस

डाळिंबाचा रस देखील हृदय निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.

त्यात अँटिऑक्सिडेंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, जे हृदयरोग विकसित होण्यापासून रोखतात. डाळिंबात पॉलीफेनॉल असतात जे ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करतात.

'या' कुर्तींवर स्टाईल करता येईल नेटचा दुपट्टा...

dupatta | sakal