गुलाबी रंगाच्या कपड्यांवर खुलून दिसतील ‘या’ लिपस्टिकच्या शेड्स, मिळेल परफेक्ट लूक

Monika Lonkar –Kumbhar

आपला लूक स्टायलिश दिसावा? असे प्रत्येक महिलेला वाटते. मग, स्टायलिश दिसण्यासाठी केवळ स्टायलिश आऊटफीट हवा, असे अजिबात नाही. 

Best Lipstick Shades

स्टायलिश लूक

स्टायलिश दिसण्यासाठी तुमच्या आऊटफीटसोबतच तुमची हेअरस्टाईल, तुमची ज्वेलरी आणि तुमचा मेकअप देखील तितकाच महत्वाचा असतो.

Best Lipstick Shades

जेव्हा या सर्व गोष्टी जुळून येतात, तेव्हा खरे तर तुमचा लूक स्टायलिश दिसतो. स्टायलिश लूक करताना तुम्हाला मेकअपची देखील विशेष काळजी घ्यावी लागते. 

Best Lipstick Shades

मेकअपबद्दल बोलायचे झाल्यास महिला खास करून लिपस्टिक लावण्यावर भर देतात. मात्र, गुलाबी रंगाच्या कपड्यांवर कोणती लिपस्टिक लावावी? असा प्रश्न अनेक तरूणींना पडतो. तुम्ही चिंता करू नका, आज आम्ही तुम्हाला गुलाबी रंगाच्या कपड्यांवर खुलून दिसणाऱ्या लिपस्टिक शेड्सबद्दल सांगणार आहोत.

Best Lipstick Shades

पीच कलर लिपस्टिक

जर तुम्ही दिवसा डेटवर किंवा कोणत्याही कार्यक्रमात जाणार असाल आणि फिकट गुलाबी रंगाचा ड्रेस किंवा साडी परिधान करणार असाल तर पीच कलरची लिपस्टिकची शेड ट्राय करू शकता.

Best Lipstick Shades

यामध्ये लिपस्टिकचा मॅट फिनिश लूक निवडायला विसरू नका. फिकट गुलाबी रंगाच्या ड्रेसवर लिपस्टिकचा हा शेड अधिक खुलून दिसतो. 

Best Lipstick Shades

ब्लश पिंक कलर

जर तुम्ही ब्लश पिंक कलरची किंवा बेबी पिंक कलरची साडी किंवा आऊटफीट परिधान करणार असाल तर त्यावर ब्लश पिंक कलरची लिपस्टिक खूपच सुंदर दिसेल. यात काही शंका नाही. अभिनेत्री क्रिती सेनॉन या पिंक साडीवर मॅच होणारी बल्श पिंक कलरची लिपस्टिक लावली आहे.

Best Lipstick Shades

मिस कलरफूलचे 'हे' साडी लूक्स पाहून पडाल प्रेमात..!

Pooja Sawant