वजन कमी करायचे आहे? मग, ‘या’ कंदमुळांचा आहारात करा समावेश

Monika Lonkar –Kumbhar

जीवनशैली

आजकाल लोकांची जीवनशैली पूर्णपणे बदलली आहे. धकाधकीचे जीवन, बिघडलेला आहार, आणि व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत.

Health Care

लठ्ठपणा

या समस्यांमध्ये लठ्ठपणाचा समावेश आहे. लठ्ठपणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक जण लठ्ठपणामुळे त्रस्त झाले आहेत.

Health Care

वाढलेले वजन

मग, हे वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक जण जिममध्ये वर्कआऊट करण्यापासून ते जॉगिंग करणे, चालणे, योगासने यांचा आधार घेताना दिसतात. 

Health Care

संतुलित आहार

मात्र, या सर्व गोष्टी नियमितपणे नाही केल्या, तर पुन्हा परिस्थिती जैसे थे राहते. परंतु, केवळ व्यायाम करून वजन नियंत्रित करता येत नाही. त्यासाठी हेल्दी डाएट प्लॅन असणे, खूप आवश्यक आहे.

Health Care

मूळा

मुळ्यामध्ये सर्वाधिक फायबर्स आणि कमी कॅलरीज असतात. त्यामुळे, मुळ्याचे सेवन केल्याने आपले पोट भरलेले राहते आणि फार काळ भूक देखील लागत नाही. इतकेच नव्हे तर मुळ्याचे सेवन केल्याने पचनसंस्था सुरळीत राहण्यास आणि वजन कमी करण्यास मदत होते.

Health Care

बीट

बीटामध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळून येतात. वजन कमी करण्यासाठी खास करून बीटाचे सेवन केले जाते. यासोबतच शरीरातील रक्त वाढवण्यासाठी बीट फायेशीर आहे. त्यामुळे, अनेक जण त्यांच्या आहारात बीटाचा समावेश करतात.

Health Care

गाजर

बीटा कॅरोटिनयुक्त असलेले हे गाजर केवळ आपली दृष्टी सुधारत नाही, तर आपले वजन नियंत्रित ठेवण्यासाठी देखील गाजर फायदेशीर आहे. गाजराचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. 

Health Care

बॉलिवूड अभिनेत्रींना सिक्विन्स साड्यांची भलतीच क्रेझ..!

sequin sarees