पुजा बोनकिले
स्वातंत्र्यादिनानिमित्त संपुर्ण देशात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यंदा १५ ते १९ ऑगस्ट असा वीकेंड आला आहे.
यामुळे अनेकजण फिरायला जाण्याचा प्लॅन बनवत आहेत.
पण लाँग वीकेंडला फिरायला जाण्यापुर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
सर्वात आधी सहलीवर आपल्यासोबत नेण्यासारख्या गोष्टींची यादी तयार करा.
आता तुम्ही तयार केलेल्या यादीनुसार पॅक करा.
पॅकिंग करताना वस्तू नेहमी व्यवस्थित ठेवा.
फिरायला निघण्यापूर्वी तुमची कागदपत्रे सोबत ठेवा. तुमचे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, ओळखपत्र, आधार कार्ड इत्यादी सोबत ठेवा.
फ्लाइट किंवा ट्रेनने जात असाल तर तिकीट अगोदर बुक करा. यामुळे तुमचे पैसे वाचतील.