kimaya narayan
यावर्षीच सुपरहिट ठरलेलं स्त्री 2 मधील आज की रात हे गाणं तुमच्या प्लेलिस्टमध्ये मस्ट आहे. सचिन जिगर यांनी कंपोझ केलेलं आणि मधुमिताने गायलेले गाणं सध्याचं पार्टीमधील हिट गाणं आहे.
मित्राजने लिहिलेलं, गायलेलं अखियां गुलाब हे 'तेरी बातो में ऐसा उलझा जिया' सिनेमातील गाणं पार्टीसाठी बेस्ट आहे.
विकी कौशलच्या तौबा तौबा गाण्याशिवाय यावेळची न्यू इयर पार्टी अपूर्ण आहे. करण औजलाने गायलेलं हे गाणं कमाल आहे.
बेबी जॉन सिनेमातील कीर्ती सुरेश आणि वरुण धवनवर चित्रित झालेलं नैन नैन मटक्का तुम्हाला न्यू इयर पार्टीत नदीची नाचवेल. दिलजीत दोसांज आणि धी यांनी हे गाणं गायलं आहे.
पिटबुल, दिलजीत दोसांज आणि नीरज श्रीधर यांनी गायलेलं भुलभुलैय्या 3चा टायटल ट्रॅक तुमच्या पार्टीची जान आहे. हे गाणं तुम्ही प्लेलिस्टमध्ये जरूर घ्या.
सचिन-जिगर यांनी कम्पोझ केलेलं आणि जस्मिनने गायलेलं तरस हे गाणं तुमच्या न्यू इयरच्या पार्टीत वाजायलाच हवं. शर्वरीने केलेली हुकस्टेप तुम्ही पार्टीत नाही केली तर तुम्ही पार्टीत काय केलं ?
भोजपुरी सुपरस्टार पवन सिंह, दिव्या कुमार आणि सिमरन चौधरीने गायलेल स्त्री 2 मधील आयी नई हे गाणं तुमच्या प्लेलिस्टमध्ये हवंच.
विकी विद्या का वो वाला व्हिडीओ सिनेमातील शिल्पा राव आणि साचेत टंडनने गायलेलं मेरे मेहबूब हे गाणं बेस्ट पार्टी नंबर आहे.
पवन सिंह, रुपाली जग्गा, रुपेश मिश्रा आणि मनसा जिमी यांनी गायलेलं चुम्मा हे गाणंही हिट आहे.