जेवणानंतर गोड खाण्याची इच्छा होते? ट्राय करा 'हे' लो कॅलरी ऑप्शन्स

Monika Lonkar –Kumbhar

रात्रीचे जेवण

रात्रीचे जेवण केल्यानंतर अनेकांना काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते.

परंतु, रोज जेवण केल्यावर गोड पदार्थ खाल्ल्यामुळे, याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

सतत गोड खाल्ल्यामुळे रक्तातील साखर देखील वाढू शकते. त्यामुळे, जर तुम्हाला गोड खायचे असेल तर कमी कॅलरीज असलेले पदार्थ तुम्ही खाऊ शकता. कोणते आहेत ते पदार्थ? जाणून घेऊयात.

फ्रूट सॅलेड

रात्रीच्या डेझर्टसाठी फ्रूट सॅलेड हा एक उत्तम पर्याय आहे.

गाजरचा हलवा

गाजरचा हलवा हा देखील बेस्ट ऑप्शन आहे. फक्त हा हलवा बनवताना त्यात साखरेच्याऐवजी मध घाला.

चिया स्मूदी

लो कॅलरीज चिया स्मूदी चवीला जितकी उत्तम लागते तितकीच ती बनवायला अतिशय सोपी आहे.

भोपळ्याचा हलवा

भोपळ्याच्या हलव्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी आढळते. त्यामुळे, डेझर्टसाठी हा देखील उत्तम पर्याय आहे.

पहिल्यांदाच योगा करताय? मग, लक्षात ठेवा 'या' गोष्टी, सराव होईल सुलभ