Aarti Badade
नाचणी पीठ, पाणी, लसूण पाकळ्या, हिरवी मिरची, जिरे पावडर, मीठ, ताक, कोथिंबीर
एका भांड्यात नाचणी पीठ व पाणी घेऊन चांगलं मिसळा.हे मिश्रण रात्रभर भिजत ठेवा.अधिक आंबट चव हवी असल्यास ताकात भिजवले तरी चालेल.
तव्यावर २ कप पाणी गरम करा.उकळल्यावर गॅस बंद करून नाचणीचं पीठ हळूहळू घालावं.सतत ढवळत राहा गुठळ्या होऊ देऊ नका.गॅस पुन्हा चालू करा.
त्यात किसलेला लसूण, हिरवी मिरची, जिरे पावडर आणि मीठ घाला.मंद ते मध्यम आचेवर ८-१० मिनिटं शिजवा.सतत ढवळत राहा.
मिश्रण शिजल्यानंतर गॅस बंद करा. आंबील पूर्णपणे थंड होऊ द्या.थंड झाल्यावर घट्ट होतं ही योग्य consistency आहे.
ग्लासमध्ये आधी आंबील घालावं.त्यात ताक मिसळा आणि नीट हलवा.कोथिंबीरने सजवा.
चविष्ट लागते,आरोग्यासाठी पौष्टिक, उन्हाळ्यात हे पिणे खूपच फायदेशीर आहे.