'बेलनची फटाकडी' पक्षाची काय आहे खासियत; सांगलीत आढळतात तीन उपप्रजाती

सकाळ डिजिटल टीम

'बेलनची फटाकडी'

फ्रेंच निसर्गवादी लुईस अँटोनी बेलन (Louis Antoine Baillon) यांच्या नावाने ओळखला जाणारा हा अनोखा पक्षी. ‘बेलनची फटाकडी’ (Baillon''s Crake) असे त्याचे नाव.

Baillons Crake Bird | esakal

वजन फक्त ४० ग्रॅम

आकाराने १५ ते २० सेंटिमीटर तर वजनाने फक्त ४० ग्रॅम असणारा हा पक्षी. मुळतः युरोपमध्ये आढळतो, तर भारत व पूर्व आफ्रिकेत हिवाळ्यासाठी येतो.

Baillons Crake Bird | esakal

प्रचंड चपळता

त्याच्या प्रचंड वेगामुळे व चपळतेमुळे या प्रजातीला ‘फटाकडी’ (Crake) असे नाव पडले आहे.

Baillons Crake Bird | esakal

पक्षी विलुप्त होण्याच्या मार्गावर

दलदली अधिवासात राहणार आणि पाणथळ कीटक खाणारा हा पक्षी काही देशांमध्ये विलुप्तीचा मार्गावर असल्याचा मानला जातो. मादी कोरड्या जागेत आपले घरटे करून ४ ते ८ अंडी देते.

Baillons Crake Bird | esakal

गुप्त पध्दतीने जीवन व्यतीत करतो

नर आणि मादी मिळून पिलांचे संगोपन करतात. हा पक्षी अतीशय गुप्त पध्दतीने जीवन व्यतीत करतो आणि क्वचितच उघड्यावर दिसतो.

Baillons Crake Bird | esakal

सांगली जिल्ह्यात तीन उपप्रजाती

सांगली जिल्ह्यात फटाकडीच्या तीन उपप्रजाती आढळतात, बेलनची फटाकडी (Baillon’s Crake), तपकिरी फटाकडी (Brown Crake) आणि लाल मानेची फटाकडी (Ruddy Breasted Crake).

Baillons Crake Bird | esakal

दलदली अधिवासात राहणारा पक्षी

हे तिन्ही पक्षी शामरावनगर आणि पटवर्धन मळा नजीकच्या ओढ्याजवळ पाहायला मिळू शकतात, अशी माहिती मिरज येथील पक्षिमित्र तेजस भिडे यांनी दिली आहे.

Baillons Crake Bird | esakal

जायफळ पाणी पिण्याचे 'हे' 7 फायदे माहितीयेत? आरोग्याशी संबंधित अनेक समस्या होतील दूर

येथे क्लिक करा...