Monika Shinde
क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2025 नुसार, डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी जगातील टॉप १० संस्थांमध्ये पाच संस्था अमेरिका मध्ये आहेत.
एमआयटी मध्ये डेटा सायन्स आणि ए.आय क्षेत्रातील सर्वोत्तम संस्थांपैकी एक आहे. इथे विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण मिळते आणि नवीन संशोधनाची संधी देखील उपलब्ध असते.
अमेरिकेच्या पिट्सबर्ग मध्ये स्थित कॅनेगी मेलन युनिव्हर्सिटी, डेटा सायन्स आणि ए. आय. च्या क्षेत्रात उच्च दर्जाचे शिक्षण देणारी प्रसिद्ध संस्था आहे.
ऑक्सफर्ड, इंग्लंडमधील एक ऐतिहासिक आणि प्रमुख युनिव्हर्सिटी आहे. इथे डेटा सायन्सच्या विविध शाखांवर उत्कृष्ट शिक्षण दिलं जातं आणि भारतीय विद्यार्थ्यांचं देखील मोठं प्रमाण आहे.
कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी, बर्कले ही अमेरिका येथील एक प्रमुख संस्था आहे. इथे 40,000 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि डेटा सायन्ससाठी ते एक उत्कृष्ट केंद्र मानले जाते.
सिंगापूरमधील नानयांग टेक्नोलॉजिकल युनिव्हर्सिटी (NTU), डेटा सायन्सच्या क्षेत्रात टॉप १० यादीमध्ये पाचव्या स्थानावर आहे. हे संस्थान ए. आय. आणि डेटा सायन्ससाठी प्रसिद्ध आहे.