Pranali Kodre
इंडियन प्रीमियर लीग २०२५ हंगामासाठी सौदी अरेबियातील जेद्दाहमध्ये २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी लिलाव झाला.
हा लिलाव विक्रमी ठरला. कारण या लिलावातून इतिहासातील दोन सर्वात महागडे खेळाडू मिळाले.
आयपीएल २०२५ लिलावात तब्बल ३ खेळाडूंना २० कोटींहून अधिक रकमेची बोली लागली. त्यामुळे आता आयपीएल लिलावात २० कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळालेल्या खेळाडूंची संख्या ५ झाली आहे.
आयपीएल लिलावामधील आत्तापर्यंतचे सर्वात महागड्या ५ खेळाडू कोण आहेत, हे पाहू
लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल २०२५ लिलावात ऋषभ पंतसाठी तब्बल २७ कोटी रुपये मोजले. तो सर्वात महागडा खेळाडू ठरला.
श्रेयस अय्यरसाठी पंजाब किंग्सने आयपीएल २०२५ लिलावात २६.७५ कोटी रुपयांची बोली लावली. त्यामुळे तो दुसऱ्या क्रमांकाचा महागडा खेळाडू ठरला.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कसाठी कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल २०२४ लिलावात २४.७५ कोटी रुपये खर्च केले होते.
कोलकात नाईट रायडर्स अष्टपैलू खेळाडू वेंकटेश अय्यरला परत घेण्यासाठी तब्बल २३.७५ कोटी रुपयांची बोली आयपीएल २०२५ लिलावात लावली.
सनरायझर्स हैदराबादने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्ससाठी २०.५० कोटी रुपये आयपीएल २०२४ लिलावात खर्च केले होते.