एकदा तरी भेट दिलीच पाहिजे अशी भारतातील नाग देवतेची ७ मंदिरं

Anushka Tapshalkar

नागोबा मंदिर, महाराष्ट्र

गोंड समाजाच्या श्रद्धास्थानी असलेलं हे मंदिर तेलंगणा-महाराष्ट्र सीमेलगत आहे. फेब्रुवारीत येथे जत्रा भरते.

Nagoba Temple, Maharashtra | sakal

नागा बाबा मंदिर, राजस्थान

बीकानेर जिल्ह्यातील या मंदिरात नागदेवतेची मूर्ती कायम धूपधोणीत असते. यात्रेच्या वेळी हजारो भक्त येथे येतात.

Naga Baba Temple, Rajsthan | sakal

सुब्रमण्य स्वामी मंदिर, आंध्र प्रदेश

नागदेवतेचे रूप मानले जाणारे सुब्रमण्य स्वामी यांचे हे मंदिर भक्तांमध्ये प्रसिद्ध आहे.

Subramanya Swamy Temple, Andhra Pradesh | sakal

खज्जी नाग मंदिर, हिमाचल प्रदेश

चंबा जिल्ह्यात वसलेलं हे मंदिर देवदाराच्या जंगलात आहे. इथे नागपंचमीला विशेष उत्सव साजरा होतो.

Khajji Nag Temple, Himachal Pradesh | sakal

मण्णारसाला मंदिर, केरळ

नागदेवतेसाठी प्रसिद्ध असलेलं हे मंदिर सर्पपूजेसाठी ओळखलं जातं. येथे हजारो नागमूर्ती आहेत.

Mannarasala Temple, Kerala | sakal

नागथम्मन मंदिर, तामिळनाडू

चेन्नईजवळील हे मंदिर स्थानिक नागदेवतेला समर्पित आहे. येथे महिलांची विशेष श्रद्धा असते.

Nag Thamman Temple, Tamilnadu | sakal

वासुकी नाग मंदिर, उत्तराखंड

उत्तरकाशी जिल्ह्यातील हे मंदिर वासुकी नागाला समर्पित आहे. इथे नैसर्गिक वातावरणात भक्ती आणि शांतता अनुभवता येते.

Vasuki Nag Temple, Uttarakhand | sakal

नागाचा आणि नागपूरचा काय संबंध ? कसं मिळालं नाव

Who Established Nagpur City? | esakal
आणखी वाचा