Monika Shinde
प्रवासाची आवड आहे? मग अशा ७ नोकऱ्या जाणून घ्या, ज्या तुम्हाला जग फिरवतील आणि चांगली कमाईही करून देतील
विमानात प्रवाशांची सेवा, सुरक्षा आणि सोयीसुविधांची जबाबदारी घेणारी व्यक्ती. देश-विदेशात सतत प्रवास आणि विविध संस्कृतींचा अनुभव मिळतो.
फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी ही संधी पर्वणीसारखी आहे. जगभरातील ठिकाणांचे फोटो घेऊन किंवा प्रवासाच्या कथा लिहून कमाई करता येते.
कंपन्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रम व्यवस्थापित करण्यासाठी इव्हेंट मॅनेजर सतत प्रवास करतात. चांगली कमाई आणि ग्लॅमरस जीवनशैली यामुळे ही नोकरी आकर्षक ठरते.
वेगवेगळ्या देशांत फिरून भाषांतर सेवा देणं किंवा परदेशी कंपन्यांसाठी संवाद साधणं प्रवासही होतो आणि भाषा कौशल्याचाही उपयोग!
समुद्रावरून फिरणाऱ्या आलिशान क्रूझवर काम करताना अनेक देशांमध्ये जाण्याची संधी मिळते. खानपान, मनोरंजन, व्यवस्थापन अशा विविध भूमिका यात असतात.
प्रवास इच्छुकांसाठी योजना तयार करणं, बुकिंग करणं आणि स्वतः त्या ठिकाणी जाऊन पाहणी करणं हे या नोकरीचं वैशिष्ट्य. टुरिझम क्षेत्रात करिअर घडवण्याची मोठी संधी.
ट्रेकिंग, राफ्टिंग, स्कायडायव्हिंग यांसारख्या साहसी खेळांमध्ये रूची असणाऱ्यांसाठी ही नोकरी योग्य. नैसर्गिक ठिकाणी राहून काम करता येतं.