Nepal Tourist Places : नेपाळमधील 'ही' 8 ठिकाणं पाहिलीत का? 'पृथ्वीवरील स्वर्ग' अनुभवायला मिळेल; एकदा तरी जरूर पहा!

बाळकृष्ण मधाळे

Nepal Tourist Places : जर तुम्ही नेपाळला भेट देण्याचा विचार करत असाल, तर खालील ८ अद्वितीय ठिकाणे तुमच्या प्रवास यादीत आवर्जून समाविष्ट करा. ही ठिकाणे त्यांच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे आणि ऐतिहासिक महत्त्वामुळे प्रवाशांसाठी एक वेगळाच अनुभव देतात.

Nepal Tourist Places

|

esakal

काठमांडू

नेपाळची राजधानी काठमांडू हे सांस्कृतिक वारसा आणि ऐतिहासिक मंदिरे यासाठी प्रसिद्ध आहे. पशुपतिनाथ मंदिर, मंकी मंदिर (स्वयंभूनाथ स्तूप) आणि दरबार स्क्वेअर हे येथे अवश्य पाहण्याजोगी स्थळ आहेत.

Nepal Tourist Places

|

esakal

लुंबिनी

भगवान गौतम बुद्धांचे जन्मस्थान लुंबिनी हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट आहे. येथे माया देवी मंदिर, अशोक स्तंभ आणि प्राचीन बौद्ध मठ पाहायला मिळतात.

Nepal Tourist Places

|

esakal

पोखरा

नेपाळचे स्वर्ग म्हणून ओळखले जाणारे पोखरा तलाव, पर्वतरांग आणि हिमालयाच्या अद्भुत दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. फेवा तलाव, ताल बाराही मंदिर, शांती स्तूप, सारंगकोट व्यू पॉइंट आणि देव फॉल्स ही प्रमुख आकर्षणे आहेत.

Nepal Tourist Places

|

esakal

इलाम

हिरव्या दऱ्या, धबधबे आणि मनमोहक हवामानासाठी प्रसिद्ध इलाम हे नेपाळमधील सर्वात रमणीय ठिकाणांपैकी एक आहे. येथील चहाच्या मळ्यांचे दृश्य पर्यटकांना खास अनुभव देते.

Nepal Tourist Places

|

esakal

माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प

साहसी प्रवाशांसाठी माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. जगातील सर्वोच्च शिखराच्या पायथ्याशी जाणारा हा प्रवास जरी कठीण असला तरी तो अत्यंत रोमांचक आणि स्मरणीय ठरतो.

Nepal Tourist Places

|

esakal

नगरकोट

जर तुम्हाला नेपाळमधील सर्वात सुंदर सूर्योदय आणि सूर्यास्त पाहायचा असेल, तर नगरकोट सर्वोत्तम ठिकाण आहे. येथील डोंगररांगांमधून दिसणारे दृश्य अविस्मरणीय असते.

Nepal Tourist Places

|

esakal

गुडे पोखरी (रारा तलाव)

नेपाळमधील सर्वात मोठा रारा तलाव म्हणजे निसर्गप्रेमींसाठी खरा खजिना आहे. पर्वतरांगांनी वेढलेले हे ठिकाण शांत, स्वच्छ आणि लपलेल्या स्वर्गासारखे भासते.

Nepal Tourist Places

|

esakal

जनकपूर

धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे जनकपूर हे माता सीतेचे जन्मस्थान मानले जाते. येथील जानकी मंदिर हजारो भाविकांना आकर्षित करते आणि तेथील धार्मिक वातावरण मन मोहवून टाकते.

Nepal Tourist Places

|

esakal

ऐतिहासिक स्थळांपासून ते दऱ्या-खोऱ्या, निसर्ग सौंदर्यापर्यंत..; महाबळेश्वरमधील 'ही' सुंदर ठिकाणं पाहाच!

Mahabaleshwar Tourist Places | esakal
येथे क्लिक करा...