सूरज यादव
लष्करावर खर्च
जगात गेल्या दीड दोन वर्षांत अनेक देशांमध्ये संघर्षाचं वातावरण दिसून आलं. यामुळे जागतिक पातळीवर लष्करी खर्चातही वाढ झालीय.
जगात लष्करावर जितका खर्च केला जातो त्याच्या ५० टक्के खर्च हे अमेरिका आणि चीन हे दोन देश मिळून करतात.
सर्वाधिक लष्करावर खर्च अमेरिकेकडून केला जातो. जीडीपीच्या ३.४ टक्के म्हणजेच जवळपास १ हजार अब्ज डॉलर्स इतका खर्च अमेरिका लष्करावर करते.
अमेरिकेनंतर लष्करावर खर्चाच्या बाबतीत चीनचा नंबर लागतो. चीन ३१४ अब्ज डॉलर्स इतकी रक्कम लष्करासाठी खर्च करते. जीडीपीच्या १.७ टक्के इतका हा वाटा आहे.
लष्करावर खर्चाच्या बाबतीत रशिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. जीडीपीच्या तब्बल ७.१ टक्के म्हणजेच १४९ अब्ज डॉलर्स इतकी रक्कम लष्करावर खर्च केली जाते.
भारतसुद्धा लष्करावर मोठ्या प्रमाणावर खर्च करतो. भारत जीडीपीच्या १.९ टक्के म्हणजेच ८६ अब्ज डॉलर्स इतका खर्च लष्करावर करतो.
भारतानंतर खर्चाच्या बाबतीत सौदी अरेबिया, ब्रिटनचा क्रमांक लागतो. हे देश लष्करावर अनुक्रमे ८२ आणि ८० अब्ज डॉलर्स खर्च करतात.
रशियासोबत संघर्ष सुरू असलेला युक्रेन देश जीडीपीच्या तब्बल ३४ टक्के इतकी रक्कम लष्करावर खर्च करत आहे. ही रक्कम ६५ अब्ज डॉलर्स इतकी आहे.
जर्मनी ६५ अब्ज डॉलर्स तर फ्रान्स आणि जपान हे प्रत्येकी ५५ अब्ज डॉलर्स इतका खर्च लष्करासाठी करतात.