Monika Shinde
प्रवासाला निघताना बॅग पॅकिंग करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यावश्यक असतं. या टिप्समुळे तुमचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होईल.
बॅग पॅकिंग सुरू करण्याआधी काय-काय लागेल याची यादी बनवा. यामुळे काहीही विसरणार नाही आणि पॅकिंगही अधिक सुटसुटीत होईल.
पासपोर्ट, रोख रक्कम, दागिने, आणि महत्त्वाचे कागदपत्रे नेहमी हँडबॅगमध्ये ठेवा. मोठ्या बॅगेऐवजी जवळ ठेवणं अधिक सुरक्षित ठरतं.
संपूर्ण पैसे एकाच बॅगेत न ठेवता वेगवेगळ्या सुरक्षित ठिकाणी ठेवा. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती आली तरी सगळी रक्कम एकाचवेळी गमावणार नाही.
प्रवासासाठी TSA लॉक किंवा कॉम्बिनेशन लॉक असलेली बॅग वापरा. यामुळे तुमचं सामान अधिक सुरक्षित राहील, विशेषतः विमानप्रवासात.
कपडे, उपकरणं आणि प्रसाधनांची वस्त्रं व्यवस्थित रोल किंवा फोल्ड करून लावा. यामुळे जागा वाचते आणि बॅग व्यवस्थित राहते.
शॅम्पू, लोशन, परफ्युम यांसारख्या द्रव वस्तू झिपलॉक बॅगमध्ये ठेवा. यामुळे गळती टळते आणि कपड्यांवर डाग पडत नाहीत.
मोबाईल, लॅपटॉप किंवा कॅमेऱ्यासाठी चार्जर, पावर बँक हे तुमच्या हँडबॅगमध्ये ठेवा. प्रवासात संपर्क साधणं आणि फोटोंसाठी हे आवश्यक असतं.