Pranali Kodre
इंडियन प्रीमियर लीग २०२५ लिलाव जेद्दाहमध्ये २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी झाला.
या लिलावाच्या पहिल्या दिवशी सुरुवातीला मुंबई इंडियन्स संघ शांत होता. त्यांनी सुरुवातीला कोणावरच बोली लावली नव्हती.
मात्र, नंतर त्यांनी जोफ्रा आर्चरला खरेदी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, राजस्थानने त्याला खरेदी केले.
त्यानंतर मात्र, मुंबईने न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टला हातून जावू दिले नाही.
मुंबईने बोल्टसाठी राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांना मागे टाकत यशस्वी १२.५० कोटी रुपयांची बोली लावली.
त्यामुळ बोल्ट आता आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणार आहे.
बोल्ट यापूर्वीही २०२० आणि २०२१ मध्ये मुंबईकडून खेळला होता, त्याने मुंबईकडून चांगली कामगिरीही केली होती.
बोल्टने मुंबईसाठी २९ सामने खेळले असून ३८ विकेट्स घेतल्या आहेत.
दरम्यान, बोल्ट मुंबईत परतल्याने चाहत्यांना पुन्हा एकदा जसप्रीत बुमराहबरोबर त्याची जोडी पाहायला मिळणार आहे.
मुंबईकडून खेळताना याआधी बोल्ट आणि बुमराह यांच्या जोडीने अनेकदा फलंदाजांची भंबेरी उडवली होती. आता पुन्हा या दोन वेगवान गोलंदाजांची एकत्र जोडी पाहायला मिळणार आहे.
बुमराहला मुंबई इंडियन्सने जसप्रीत बुमराहला १८ कोटी रुपयांमध्ये रिटेन केलेलं आहे.