इफ्तारपर्यंत ताजेतवाने राहण्यासाठी सहरीमध्ये हे हेल्दी ज्यूस ट्राय करा!

Monika Shinde

रमजान

रमजानमध्ये रोजा ठेवताना सहरीत असे पदार्थ घ्या ज्यामुळे पोट लांब वेळ भरे राहील. ज्यूस हे उत्तम पर्याय आहे.

ओट्स आणि केळी ज्यूस

ओट्स आणि केळ्याची ज्यूस हेल्दी आहे. ओट्समध्ये फायबर्स असतात, ज्यामुळे पोट भरलेलं वाटतं, तर ओट्स, केळा, दूध आणि मध एकत्र करून मिक्सर करा

ड्राय फ्रुट्स ज्यूस

ड्राय फ्रुट्स जसे बदाम, अखरोट, काजू आणि खजूर तुम्हाला आवश्यक पोषण देतात. यासाठी ड्राय फ्रुट्स रात्री भिजवून ठेवा आणि नंतर दूधासोबत मिक्सर करा.

चिया सीड्स आणि बेरी ज्यूस

चिया सीड्स आणि बेरी ज्यूस पोटासाठी हलकी आणि फायबर्सने भरलेली असते. स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, दही आणि चिया सीड्स एकत्र करून मिक्सर करा.

ॲव्होकॅडो आणि खजूर ज्यूस

ॲव्होकॅडो आणि खजूर ज्यूस हेल्दी फॅट्स आणि नैसर्गिक गोडवा देते. ॲव्होकॅडो , खजूर, दूध आणि मध एकत्र करून मिक्सर करा.

पीनट बटर आणि कोको ज्यूस

पीनट बटरमध्ये प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स असतात, जे सहरी नंतर भूक कमी करते. केळी, पीनट बटर, कोको पावडर आणि दूध एकत्र करून मिक्सर करा.

संध्याकाळच्या ७ सवयींच्या मदतीने रहा फिट आणि स्लीम

येथे क्लिक करा