काळ्या, घनदाट आयब्रो हव्या असतील तर हा उपाय नक्की करून पहा...

Aishwarya Musale

जाड भुवया चेहऱ्याचे सौंदर्य वाढवतात. आपल्यापैकी अनेकांच्या भुवया फार जाड नसतात. काही जणांच्या भुवयांचे केस हे जाड, भरीव असतात तर काही जणांच्या भुवया या अगदीच पातळ असतात.

eyebrows | sakal

परंतु आपल्या भुवया जेवढ्या जाड व भरीव असतील तेवढ्याच त्या दिसायला अतिशय सुंदर दिसतात. भुवयांचे केस जाड, भरीव असलयाने आपण त्यांना हवा तसा आकार देऊ शकतो.

eyebrows | sakal

आयब्रोचे सौंदर्य वाढवण्यासाठी काहीजणी पार्लरमध्ये जातात तर काही तरुणी आयब्रो पेन्सिलचा वापर करतात. पण ब्युटी पार्लरमध्ये जाऊन पैसा खर्च करण्याऐवजी घरगुती उपाय करूनही आपण आपले आयब्रो नैसर्गिक पद्धतीने जाड करू शकतो.

eyebrows | sakal

दूध

भुवया जाड व दाट करण्यासाठी तुम्ही दुधाचा वापर करू शकता, परंतु यासाठी तुम्ही कच्चे दूध वापरावे. यामध्ये अनेक प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि फॅटी ॲसिड असतात, यामुळे भुवयांच्या केसांची वाढ होते.

milk | sakal

अंडी

भुवया जाड व दाट करण्यासाठी अंड्याचा आतील भाग देखील वापरता येतो. अंड्यातील पिवळ बलकमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात ज्यामुळे भुवयांची वाढ होण्यास मदत होते. यासोबतच अंड्यातील पिवळ बलक वापरल्याने भुवया सिल्की होतील.

egg | sakal

ग्रीन टी

ग्रीन टी च्या मदतीने देखील आपण भुवयांना जाड व भरीवपणा देऊ शकतो. यासाठी ग्रीन टी बनवा आणि थंड करा, नंतर कापसाच्या मदतीने भुवयांवर लावा. वीस मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

green tea | sakal

एलोवेरा जेल

भुवया भरीव बनवण्यासाठी आपण त्यावर एलोवेरा जेलही लावू शकता. यासाठी ४ ते ५ मिनिटे या जेलने भुवयांना मसाज करावा.

Aloe Vera Gel | sakal

अर्ध्या तासानंतर चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. जर आपल्याकडे ताज्या कोरफडीचा गर नसेल तर आपण बाजारात विकत मिळणाऱ्या एलोवेरा जेलचा देखील वापर करू शकता. 

झोपण्यापूर्वी अशी घ्या चेहऱ्याची काळजी; वाढेल सौंदर्य!