एथनिक ड्रेससोबतही मॅच होतील चोकर्स...

Aishwarya Musale

चोकर

लग्नसमारंभात स्त्रिया असे पोशाख घालतात ज्यामध्ये त्या सुंदर दिसतील. महिला परफेक्ट दिसण्यासाठी मॅचिंग ज्वेलरी घालतात, पण हल्ली स्त्रिया दागिन्यांऐवजी चोकर घालतात आणि त्यामुळेच आजकाल चोकर्स ट्रेंडमध्ये आहेत.

तुमच्या आउटफिटसोबत कोणत्या प्रकारचे चोकर घालायचे याबद्दल तुमचा गोंधळ उडत असेल, तर आज आम्ही तुम्हाला चोकरच्या काही डिझाईन्स दाखवणार आहोत.

मोती चोकर

जर तुम्ही साडी नेसत असाल तर त्यासोबत पर्ल चोकर घालू शकता. तुम्हाला अनेक डिझाईन्समध्ये पर्ल चोकर मिळतील जे तुम्ही तुमच्या साडीसोबत घालू शकता. आजकाल पांढऱ्या मोत्याचे चोकर्स सर्वाधिक पसंत केले जातात.

पण तुम्हाला काही नवीन हवे असेल तर तुम्ही साडीसोबत रंगीबेरंगी पर्ल चोकर्सही घालू शकता. तुम्ही या प्रकारचे चोकर ऑनलाइन किंवा ऑफलाइन खरेदी करू शकता आणि तुम्हाला हे चोकर 200 ते 300 रुपयांच्या दरम्यान मिळतील.

गोल्डन चोकर

या प्रकारचे चोकर तुम्ही सिल्क साडीसोबत घालू शकता. हे चोकर सिल्क साडीसोबत घालणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

हा चोकर तुम्ही बाजारात किंवा ऑनलाइन खरेदी करू शकता आणि तुम्हाला हा चोकर स्वस्त दरात मिळेल. हा चोकर तुम्हाला बाजारातून 300 ते 500 रुपयांना मिळेल.

डायमंड आणि स्टोन चोकर

तुमच्या आउटफिटनुसार तुम्ही या प्रकारचा चोकर निवडू शकता. या चोकरमध्ये डायमंड आणि स्टोनचे काम करण्यात आले असून हे चोकर तुमच्या आउटफिटशी मॅच करेल.

तुम्ही साडी नेसत असाल किंवा लेहेंगा, या दोन्ही पोशाखांच्या रंगानुसार तुम्ही चोकरचा रंग आणि डिझाइन निवडू शकता. तुम्हाला हे चोकर्स ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही मिळतील, जे तुम्ही 400 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

एथनिक आणि वेस्टर्न लुकसोबत ट्राय करा 'ही' हेअरस्टाईल...

hairstyle | sakal