सकाळ डिजिटल टीम
हिवाळ्यात प्रतिकारशक्तीला मजबूत ठेवणे खूप महत्त्वाचे असते. यासाठी व्हिटॅमिन सीयुक्त पेय पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते.
आवळा व्हिटॅमिन सीचा एक उत्तम स्रोत आहे. यामुळे पाण्यात आवळा, आले आणि मध एकत्रित करून प्यायल्याने रोगप्रतिकारशक्तीला चालन मिळते.
कीवीमध्ये भरपूर व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. दही, कीवीचे तुकडे, आणि थोडे मध एकत्र करून बनवलेली स्मूदी पोषणासाठी उपयुक्त ठरते. यामुळे तुमचा थकवा कमी होऊन ताजेतवाने वाटते.
आले आणि हळद असलेला हा हर्बल चहा शरीरातील जळजळ दूर करतो आणि सर्दीपासून बचाव करण्यासाठी व्हिटॅमिन सीचा चांगला डोस देखील देतो.
पपईमध्ये व्हिटॅमिन सी व फायबर भरपूर असते. ताज्या पपईचा रस बनवून पिल्यास शरीराला ऊर्जा आणि पोषण मिळते.
सर्वात जून्या उपायांपैकी एक हे पेय आहे. व्हिटॅमिन सी युक्त लिंबू आणि अँटीबॅक्टेरिअल गुणधर्म असलेल्या मधाचे हे मिश्रण घसा खवखवणे शांत करते आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवते.
बेलफळात व्हिटॅमिन सी असते. त्याचा रस काढून त्यात थोडी साखर किंवा गूळ, मीठ आणि जिरेपूड एकत्र करून तयार केलेला हा रस पचन सुधारणा, शरीर शुद्धीकरण यांसाठी उपयुक्त ठरतो. तसेच हिवाळ्यात याचा प्रामुख्याने शरीराला उष्णता आणि पोषण देण्यासाठी होतो.
हिवाळ्याच्या दिवसात ताजेतवाने आणि प्रसन्न वाटण्यासाठी आलं आणि लिंबाचा चहा उत्तम पेय आहे. आलं आणि लिंबू यांमध्ये अँटीबॅक्टेरिअल गुणधर्म आहे जो आजारांवर मत करून रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतो.