सकाळ डिजिटल टीम
तुळशीची पाने रोज सकाळी उपाशीपोटी चावून खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो. म्हणूनच, दिवसाची सुरुवात तुळशीने करणे फायदेशीर मानले जाते.
जर तुम्ही चहा पीत असाल, तर त्यात ४ ते ५ तुळशीची पाने उकळवून घालावीत. यामुळे चहा चविष्ट होतो आणि हंगामी ताप, सर्दी यांसारख्या त्रासांपासून संरक्षण होते.
काळ्या चहामध्ये तुळशीची पाने मिसळून पिल्याने शरीर डिटॉक्स होते. तसेच हा चहा रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि हंगामी आजारांशी लढण्याची ताकद देतो.
तुळशीचा काढा तयार करण्यासाठी ५ ते ६ पाने एक ग्लास पाण्यात उकळा. पाणी अर्धे उरल्यावर ते गाळून घ्या. हा काढा सकाळी प्यायल्यास सर्वाधिक फायदेशीर ठरतो.
तुळशीच्या पानांचा काढा करून पिणे पावसाळ्यात अत्यंत लाभदायक ठरते. हा काढा व्हायरल इन्फेक्शन, घशातील खवखव आणि श्वसनाच्या त्रासांपासून आराम देतो.
तुळशीची पाने रोज चावून खाल्ल्याने तणाव कमी होतो, मानसिक शांती मिळते आणि मधुमेह असलेल्या रुग्णांचे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
तुळशीची वाळवलेली पाने बारीक करून त्याची पावडर बनवा आणि ती कोमट पाण्यासोबत घ्या. हे शरीरातील सूज कमी करते आणि पचनतंत्र सुधारण्यास मदत करते.