रोहित कणसे
आपल्या सर्वांच्या घरी कोणतीतरी औषधी वनस्पती असते पण आपल्याला त्याचे उपयोग माहिती नसतात, तुळशीबद्दल देखील हेच होतं.
प्रत्येकाच्या दारात असणाऱ्या तुळशीच्या पानांचा औषधी म्हणून उपयोग होतो, अनेक वर्षांपासूवन ही पाने वापरली जात आली आहेत.
अँटी ऑक्सिडंट गुण असणारी तुळसं मेटाबॉलिक प्रक्रियेत खूप फायदेशीर ठरते.
रक्तातील साखर कमी करणे, कोलेस्ट्रॉल तसेच इंफ्लामेशन सारख्या समस्यांमध्ये देखील तुळस गुणकारी ठरते.
अभ्यासातून समोर आलं आहे की, तुळशीची पाने रोज खाल्ल्याने स्ट्रेस कमी होण्यात मदत होते.
तुळशीच्या पानाच्या अर्कात असलेल्या यूजेनॉलमध्ये थकवा कमी करण्याची क्षमता असते.
रोज तुळशीची पाने खाल्ल्याने रोग प्रतिकारक क्षमता देखील सुधारते.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित असून योग्य सल्ल्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्या
मारुती सुझूकीच्या गाड्या माहागल्या; किती वाढली किंमत?