सकाळ डिजिटल टीम
आत्ता पर्यंत तुम्ही तुळशीच्या पाणंचे फायदे एकले असतीलच, पण तुम्ही मंजुळांचे फायदे एकले आहेत का?
तुळशीच्या मंजुळांचे कोणते आरोग्यदायी फायदे आहेत जाणून घ्या.
मंजुळामध्ये असलेले घटक (कॅम्फेन, सिनेओल, आणि युजेनॉल) छातीत साठलेली कफ कमी करण्यास आणि सर्दी-खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी मदत करतात.
मंजुळाचा वास घेतल्याने डोकेदुखी कमी होण्यास मदत होते.
मंजुळाचा वापर केसांची चमक परत आणण्यासाठी आणि कोंडा कमी करण्यासाठी केला जावू शकतो.
मध आणि आल्याच्या रसात मंजुळाचा रस मिसळून प्यायल्याने श्वसनविकार बरे होण्यास मदत होते.
तुळशीला "औषधी वनस्पतींची राणी" म्हणून ओळखले जाते आणि अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी तिचा उपयोग केला जातो.
तुळशीच्या पानांचे सेवन शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते.
तुळशीच्या मंजुळाचा (किंवा तुळशीच्या पानांचा) वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.