सकाळ डिजिटल टीम
घरच्या घरी बनवा चमचमीत 'चपाती वेफर्स'!
शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून तयार केलेले खुसखुशीत, कुरकुरीत आणि झणझणीत वेफर्स!
२ उरलेल्या चपात्या
१ चमचा चाट मसाला
१ चमचा लाल तिखट
तळण्यासाठी तेल
चपातीचे तुम्हाला आवडतील त्या आकारात लांबट, चौकोनी किंवा त्रिकोणी तुकडे करून घ्या.
एका कढईत मध्यम आचेवर तेल गरम करत ठेवा.
गरम तेलात चपातीचे तुकडे सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
तळून झाल्यावर वेफर्स टिशू पेपरवर काढा, जेणेकरून त्यातील अतिरिक्त तेल निघून जाईल.
तळलेल्या वेफर्सवर चाट मसाला आणि लाल तिखट घालून चांगले मिसळून घ्या.
गरमागरम चहा किंवा थंड दह्यासोबत हे चवदार वेफर्स सर्व्ह करा.