सकाळ डिजिटल टीम
उभा लिंबू का चिरू नये? या बाबत अनेक समज-गैरसमज हे आहेत.
उभा लिंबू का चिरू नये? ही एक श्रद्धा आहे की अंधश्रद्धा जाणून घ्या.
काही लोकांमध्ये अशी चुकीची समजूत आहे की लिंबू उभा चिरल्यास नकारात्मक ऊर्जा बाहेर येते आणि त्याचा वाईट परिणाम होतो.
लिंबू उभं चिरल्याने किंवा आडवं चिरल्याने कोणताही वैज्ञानिक आधार नाही. लिंबू कापण्याची पद्धत केवळ एक सवय किंवा पद्धत आहे, त्याचा वाईट शक्तींशी किंवा नशिबाशी काहीही संबंध नाही.
अनेकदा अशा प्रकारच्या समजुती लोकांमध्ये भीती निर्माण करतात आणि त्यातून त्या गोष्टींना महत्व दिले जाते.
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात फरक आहे. श्रद्धा चांगली गोष्ट आहे, पण ती योग्य माहिती आणि समजबुद्धीने असायला हवी.
अंधश्रद्धा म्हणजे बिनाकारण भीती बाळगणे किंवा एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणे, ज्याला कोणताही वैज्ञानिक आधार नसतो.
उभा लिंबू चिरू नये, ही एक अंधश्रद्धा आहे. लिंबू उभं किंवा आडवं कसंही चिरल्याने कोणताही वाईट परिणाम होत नाही. हा एक गैरसमज असल्याचे सांगण्यात येते.
तुम्ही लिंबू उभा किंवा आडवा दोन्ही पद्धतीने चिरू शकतात.