सकाळ डिजिटल टीम
बॉलीवूडमधील प्रसिद्ध पार्श्वगायक उदित नारायण यांची गाणी जशी ‘पहला नशा’, ‘पापा कहते हैं’, आणि ‘टिप टिप बरसा पानी’ आजही लोकप्रिय आहेत.
उदित नारायण सध्या त्यांच्या गाण्यांमुळे नाही, तर एक व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आले आहेत.
व्हिडिओमध्ये ते स्टेजवर एका महिलेच्या अगदी जवळ दिसत असल्यामुळे सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
या चर्चांवर प्रतिक्रिया देताना उदित नारायण म्हणाले, “मी असं काही केलं आहे का, ज्यामुळे माझ्या कुटुंबाला किंवा देशाला लाज वाटेल? माझं मन पवित्र आहे.”
उदित नारायण यांनी स्पष्ट केले की, जर कोणी त्यांच्या कृत्यांत काही वेगळं पाहत असेल, तर ती त्यांची समस्या आहे.
वादावर बोलताना उदित नारायण म्हणाले, “माझ्या आयुष्यात मी अनेक पुरस्कार मिळवले आहेत – फिल्मफेअर, राष्ट्रीय पुरस्कार, पद्मश्री, पद्मभूषण!”
उदित नारायण यांनी लता मंगेशकर यांच्यासारखा भारतरत्न पुरस्कार मिळवण्याची इच्छा व्यक्त केली.
त्यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर नव्याने चर्चा निर्माण करीत आहे.