Saisimran Ghashi
ठाकरे कुटुंबाचे मूळ आडनाव वेगळे होते. आजच्या "ठाकरे" या नावामागे एक ऐतिहासिक आणि साहित्यिक प्रेरणा आहे.
ठाकरे कुटुंब पूर्वी नाशिकजवळच्या धोडप किल्ल्याचे किल्लेदार होते. तेव्हा त्यांचे आडनाव धोडपकर असे होते.
काळानुसार कुटुंब पनवेलला स्थलांतरित झाले. तेव्हा आडनाव बदलून पनवेलकर असे झाले.
प्रबोधनकार ठाकरे यांच्या वडिलांनी मुलांना शाळेत घालताना "ठाकरे" हे आडनाव लिहिले. तेच नाव पुढे रुढ झाले.
प्रबोधनकारांना विल्यम्स Thackeray हा लेखक आवडत होता. त्यांच्यापासूनच "Thackeray" हे इंग्रजी स्पेलिंग घेतले गेले.
बाळासाहेबांनी व्यंगचित्रे काढायला सुरुवात केली. तेव्हा त्यांनी स्वतःचे नाव "Bal Thackeray" असे लिहायला सुरुवात केली.
'मार्मिक' साप्ताहिकातून बाळासाहेबांनी व्यंगचित्रांद्वारे आपले विचार मांडले.
काळाच्या ओघात बाळ ठाकरे बाळासाहेब ठाकरे झाले. त्यांच्या संघटन कौशल्याने आणि भाषणशैलीने महाराष्ट्र भारावून गेला.