गुन्हे, वाद अन् बरंच काही! राजीनामा दिलेल्या धनंजय मुंडेंबद्दल 'या' 10 गोष्टी कित्येकांना ठाऊक नाहीत

Saisimran Ghashi

धनंजय मुंडे

मंत्री धनंजय मुंडे यांनी संतोष देखमुख हत्या प्रकरणात राजीनामा दिला आहे.

santosh deshmukh murder case dhananjay munde | esakal

नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा

यामध्ये स्पष्टीकरण देताना नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंडे यांनी राजीनामा दिल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

dhananjay munde resignation reasons | esakal

अनेक गुन्हे दाखल

धनंजय मुंडे यांच्या सोबत हे पहिल्यांदा घडले नाहीये तर त्यांच्या विरोधात यापूर्वी देखील अनेक गुन्हे दाखल झाले आहेत, तसेच मोठे वाद देखील आहेत.

dhananjay munde crime list | esakal

शासकीय जमीन खोटाळा

त्यांच्या विरोधात तीन गुन्हे फसवणूकीचे आहेत. यात पुस (ता. अंबाजोगाई) येथील बलखंडी देवस्थानची शासकीय जमिन अधिकाऱ्यांसोबत संगनमत करुन या जमिनीची खाेटी खरेदी केली म्हणून गुन्हा दाखल आहे. 

walmik karad crime list | esakal

शुगर मिल्स जमीन घोटाळा

पुस शिवारात त्यांनी तीन हेक्टर १२ गुंठे जमीन जगमित्र शुगर मिल्सच्या उभारणीसाठी खरेदी केली. यासाठी १० लाख रुपये रोख व ४० लाख रुपयांचा धनादेश धनंजय मुंडेंनी दिला होता. नगदी आठ लाख ८१ हजार रुपये दिले. मात्र, हा चेकही वटला नाही.

dhananjay munde allegations | esakal

दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

तसेच १४ सप्टेंबर १९८८ साली मयत असलेल्या ज्ञानोबा बोईनवाड याच्या नावावर ता. २८ डिसेंबर २०१० साली संमतीपत्र करण्यासाठी इतर कोणाला उभा करुन तोतयागिरी केल्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाले होते.

dhananjay munde crimes | esakal

करुणा मुंडेचा वाद

त्यांची पत्नी करुणा मुंडे-शर्मा यांनी देखील त्यांच्यावर कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्याचा दावा केला होता. हा वाद महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला होता.

karuna sharma dhananjay munde controversy | esakal

रेणू शर्मा अत्याचार प्रकरण

जानेवारी २०२१ मध्ये, गायिका रेणू शर्मा यांनी मुंडे यांच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली होती जी नंतर मागे घेण्यात आली.

dhananjay munde renu sharma controversy | esakal

संतोष देखमुख हत्या प्रकरण

आता संतोष देखमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड याला शय दिल्याबद्दल त्यांच्या विरोधात मोठा वाद सुरू होता आणि त्याच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत होती.

walmik karad dhananjay munde relations | esakal

टिपू सुलतानचे वंशज कोण? चक्क चालवतात रिक्षा, सध्या कुठे आहेत?

tipu sultan descendants now | esakal
येथे क्लिक करा