राज्यसभेबाबतचे हे फॅक्ट्स प्रत्येक भारतीयाला माहिती हवेत

Manoj Bhalerao

भारतात संसदीय लोकशाही आहे. भारताच्या संसदेचे दोन सभागृह आहेत. एक लोकसभा आणि दुसरं राज्यसभा.

आज आम्ही तुम्हाला राज्यसभेबाबत काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. ज्या प्रत्येक भारतीय नागरिकाला माहिती हव्यात.

राज्यसभेला ज्येष्ठांचं सभागृह असंही म्हटलं जातं. राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे. लोकसभेप्रमाणे राज्यसभा बरखास्त होत नाही.

भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेते पीठासीन अधिकारी किंवा चेअरमन असतात.

लोकसभेच्या खासदाराचा कार्यकाळ हा सर्वसाधारणपणे ५ वर्षांचा असतो, तर दुसरीकडे राज्यसभेच्या खासदाराचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो.

एका बाजूला लोकसभेत जाणारे खासदार लोकांमधून निवडून जातात, तर राज्यसभेवर जाणाऱ्या खासदारांना आमदार मतदान करतात.

राज्यसभेत एकूण २५० खासदार असतात. ज्यामध्ये २३८ निवडून जातात, तर १२ खासदार राष्ट्रपतींकडून नामांकित केले जातात.

राज्यसभेचे एक तृतीयांश खासदार दर दोन वर्षांनी निवृत्त होतात.

'रॅडो' घड्याळांचं नवं अ‍ॅनिव्हर्सरी एडिशन लाँच!

Rado Anatom anniversary edition | eSakal