Amit Ujagare (अमित उजागरे)
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती आहे. यानिमित्त त्यांच्याबद्दल न ऐकलेले किस्से ऐकुयात.
वि. दा. सावरकर हे भारतीय राजकारणात कायम सर्वाधिक चर्चेत राहिलेले व्यक्ती आहेत.
सावरकरांना हिंदुत्वाचे कट्टर समर्थक मानलं जातं. त्यांच्या द्वीराष्ट्रवादाच्या सिद्धांताची आजही चर्चा होत असते.
सावरकर हे स्वातंत्र्यलढ्यात कार्यरत होते, तसंच बॅऱिस्टर, लेखक आणि राजकीय नेते देखील होते. जीवनातला मोठा काळ त्यांनी सेल्युलर जेलमध्ये घालवला.
त्यांच्या हयातीत त्यांच्यावरुन बराच वाद होत असतानाही त्यांचं भारताचे फील्ड मार्शल करिअप्पा आणि सॅम मानेकशॉ यांनी कौतुक करायचे.
1962 मध्ये चीनकडून भारताचा पराभव झाल्यानंतर केएम करिअप्पा यांनी सावरकरांचा उल्लेख करताना मोठं विधान केलं होतं.
एका बैठकीत एकदा करिअप्पा म्हणाले होते की, जर देशानं सावरकरांचं म्हणणं अर्थात सैन्य रणनिती अवलंबली असती तर आपला पराभव झाला नसता.
धनंजय कीर लिखीत वीर सावरकर या त्यांच्या चरित्रात करिअप्पा यांच्या या विधानाचा उल्लेख आहे. मानेकशॉ देखील त्यांचं कौतुक करायचे.