सकाळ डिजिटल टीम
व्हॅलेंटाईन डे वीक 7 फेब्रुवारीपासून सुरू होतो. हा दिवस "रोज डे" म्हणून साजरा केला जातो. प्रेमी-प्रेमिका एकमेकांना गुलाबाचे फूल देऊन प्रेमाची भावना व्यक्त करतात.
दुसरा दिवस म्हणजे "प्रपोज डे", जो 8 फेब्रुवारीला साजरा केला जातो. या दिवशी प्रेमी एकमेकांना प्रपोज करून आपली गुपित भावना व्यक्त करतात.
9 फेब्रुवारीला "चॉकलेट डे" साजरा केला जातो. या दिवशी जोडपी एकमेकांना चॉकलेट देऊन प्रेम व्यक्त करतात.
"टेडी डे" 10 फेब्रुवारीला साजरा होतो. या दिवशी, जोडपी एकमेकांना टेडी बियर भेट म्हणून देतात.
11 फेब्रुवारीला "प्रॉमिस डे" असतो. या दिवशी, जोडपी एकमेकांना प्रेम आणि सदैव एकत्र राहण्याचे वचन देतात.
12 फेब्रुवारीला "हग डे" साजरा केला जातो. या दिवशी, जोडपी एकमेकांना गळा भेट देऊन आपलं प्रेम व्यक्त करतात.
"किस डे" 13 फेब्रुवारीला असतो. जोडपी एकमेकांना किस करून आपले प्रेम आणि भावना व्यक्त करतात.
14 फेब्रुवारीला "व्हॅलेंटाईन डे" असतो, जो लव्ह वीकचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी, जोडपी एकमेकांना आयुष्यभर सोबत राहण्याचे वचन देतात आणि काही जोडपी विवाहासाठी प्रपोज करतात.