महाशिवरात्रीला उपवासात वरी खाताय? मग जाणून घ्या माहीत नसलेले 'हे' 6 फायदे

सकाळ डिजिटल टीम

वरी

महाराष्ट्रातील घाट आणि उपपर्वतीय भागात वरी / भगर / वरईची लागवड केली जाते. उपवासासाठी वरीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी एक प्रमुख पदार्थ आहे.

Varai (Bhagar) Benefits | Sakal

पौष्टिकतत्त्व

वरी धान्यात तंतुमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ, खनिज आणि लोह यांचे प्रमाण गहू व भातापेक्षा अधिक आहे. हे एक सत्वयुक्त धान्य मानले जाते, जे शरीरासाठी लाभदायक आहे.

Varai (Bhagar) Benefits | Sakal

वजन

वरीमध्ये कॅलोरी कमी असतात, ज्यामुळे वजन आटोक्यात राहते. यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते.

Varai (Bhagar) Benefits | Sakal

पचन

वरीचा हलका आहार असल्यामुळे पचनाच्या तक्रारी कमी होतात. यामुळे गॅस, ऍसिडिटी यांसारख्या समस्या टाळता येतात.

digestion | Sakal

बद्धकोष्ठतेवर

वरीचा सेवन केल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो, कारण त्यात तंतूंचे प्रमाण अधिक असते.

Varai (Bhagar) Benefits | Sakal

रक्तातील साखर

वरीमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांसाठी वरी फायदेशीर ठरते.

blood sugar | Sakal

हिमोग्लोबिन

वरीचा नियमित आहाराने रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यास मदत होते, ज्यामुळे शरीराला अधिक उर्जा मिळते.

Varai (Bhagar) Benefits | Sakal

उपयोग

वरीचा भात, भाकरी, बिस्किट, लाडू, शेवया, चकली यांसारख्या विविध पदार्थांमध्ये वापर केला जातो, जे उपवासासाठी आणि आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

Varai (Bhagar) Benefits | Sakal

आरोग्य

वरी खाल्ल्याने कोणत्याही प्रकारचे पित्त होत नाही आणि शरीराचे आरोग्य सुधारते.

Varai (Bhagar) Benefits | Sakal

आज महाशिवरात्रीच्या खास दिवशी महाराष्ट्रातील 'या' 5 ज्योतिर्लिंगाचे घ्या दर्शन

Jyotirlingas in Maharashtra for Maha Shivaratri 2025 | Sakal
येथे क्लिक करा