संतोष कानडे
नव्वदचं दशक गाजवून मराठी रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या वर्षा उसगावकर
अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी हिंदी चित्रसृष्टीतही नाव कमावलं आहे
सध्या त्या बिग बॉस मराठी या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाल्या आहेत
वर्षा उसगावकर यांचं अरेंज मॅरेज झालेलं आहे
त्यांच्या पतीचं नाव अजय शर्मा असून ते प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक रवीशंकर शर्मा यांचे पुत्र आहेत
अजय शर्मा हे कलाक्षेत्रात कार्यरत आहेत, गाण्यांची निर्मिती ते करतात
वर्षा आणि अजय यांचं २००० साली गोव्यात लग्न झालं, त्यापूर्वी ते एकमेकांना दहा वर्षांपासून ओळखत होते
वर्षा यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसं कुणाला माहिती नाही