Monika Shinde
वसंत पंचमीला वाराणसीचे घाट भक्तिरंगाने सजलेले असतात. देवी सरस्वतीची पूजा आणि पिवळी फुले अर्पण करण्याची परंपरा असते.
गंगा घाटांवर वसंत पंचमीच्या दिवशी भक्त स्नान करतात, पूजा करतात आणि पतंग उडवतात, ज्यामुळे वातावरण रंगीबेरंगी होते.
जयपूरमध्ये वसंत पंचमीला आकाशात रंगीबेरंगी पतंग उडवले जातात आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
मथुरा आणि वृंदावनमध्ये वसंत पंचमी दैवी उत्साहाने साजरी केली जाते. मंदिरांमध्ये पिवळ्या रंगाने सजावट केली जाते.
त्रिवेणी संगमावर वसंत पंचमीला भक्त पूजा करतात आणि पतंग उडवण्याचा आनंद घेतात.
दिल्लीमध्ये वसंत पंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. कुटुंबांसोबत गोड पदार्थांचा आनंद घेतला जातो.
कुरुक्षेत्रमध्ये वसंत पंचमीला येथे भक्तांचे सामूहिक पूजेचे आयोजन आणि पतंग उडवण्याचा उत्सव देखील मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
चंडीगडमध्ये वसंत पंचमी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह साजरी केली जाते. रंगीबेरंगी पतंग उडवण्याचा आनंद घेत.
जम्मूमध्ये वसंत पंचमीच्या वेळी धार्मिक समारंभ व पूजा विशेष असतात. येथील मंदिरे पिवळ्या रंगाने सजवली जातात आणि देवी सरस्वतीच्या पूजेची विशेष महत्ता असते.
लखनौमध्ये वसंत पंचमी उत्सवात सणाच्या विविध रंगांनी भरलेले असतो. लखनौचे पारंपारिक दृश्य हे वसंत पंचमीच्या आनंदात गढलेले असते.