Saisimran Ghashi
मानवी शरीरात 3 प्रकारच्या प्रकृती असतात.
त्यामध्ये कफ,वात आणि पित्त या तीन प्रकृती असतात.
आज आपण वात प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये काय लक्षणे असतात हे सांगणार आहोत.
हाडे, सांधे किंवा स्नायूंमध्ये वेदना होऊ शकतात. पोटात गॅस किंवा पचनाच्या समस्याही दिसू शकतात.
वाचन, काम, विचार किंवा शारीरिक क्रिया करत असताना व्यक्ती चंचल आणि अस्थिर असू शकतात.
झोप न येणे किंवा अधूनमधून जागरणाची समस्या असू शकते.
या प्रवृत्तीचे लोक छोट्या गोष्टींवर लगेच जेलस होतात. एकाच वेळी सुखी आणि दुःखी होण्याची प्रवृत्ती असू शकते.
ही माहिती आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मनीषा मिश्रा यांनी सकाळ स्वास्थ्यम या कार्यक्रमात दिली.