Mayur Ratnaparkhe
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचं नाव उपराष्ट्रपती पदाच्या चर्चेत आघाडीवर आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याही नावाची चर्चा आहे.
भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि विद्यमान केंद्रीयमंत्री जे.पी. नड्डा यांचे नाव उपराष्ट्रपती पदासाठी चर्चेत दिसत आहे.
राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या वसुंधराराजे यांच्या नावाचाही उल्लेख होत आहे.
जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांचंही नाव उपराष्ट्रपती पदासाठी चर्चेत घेतलं जात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार जेडीयूचे खासदार हरिवंश नारायण सिंह यांच्याही नावाचा उल्लेख उपराष्ट्रपती पदासाठी केला जात आहे.
केरळचे माजी राज्यपाल आरीफ मोहम्मद खान हे देखील उपराष्ट्रपती पदासाठी शर्यतीत दिसत आहेत.
काँग्रेसचे खासदार परंतु सध्या भाजपशी जवळीक वाढल्याने चर्चेत असलेल्या शशी थरूर यांचं नाव या शर्यतीत घेतलं जात आहे.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांचंही नाव उपरराष्ट्रपती पदाच्या शर्यतीत दिसत आहे.