Pranali Kodre
आयपीएल २०२५ मध्ये २३ मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लखनौमध्ये सामना झाला.
या सामन्यात विदर्भाच्या जितेश शर्माने दुखापतग्रस्त रजत पाटिदारच्या जागेवर प्रभारी कर्णधारपद सांभाळले.
त्यामुळे जितेश बंगळुरूचा एकूण नववा कर्णधार ठरला आहे. याआधीच्या बंगळुरूच्या ८ कर्णधारांबद्दल जाणून घेऊ.
रजत पाटिदारकडे आयपीएल २०२५ पूर्वी बंगळुरूचे कर्णधारपद सोपवण्यात आले, त्याने ११ सामन्यात नेतृत्व केले आहे. त्याने ८ सामने जिंकले आणि ३ पराभूत झाले.
फाफ डू प्लेसिस २०२२ ते २०२४ दरम्यान बगंळुरूचा कर्णधार होता. त्याने ४२ सामन्यांत नेतृत्व करताना २१ सामने जिंकले आणि २१ पराभूत झाले.
शेन वॉटसनने २०१७ मध्ये बंगळुरूचे ३ सामन्यात नेतृत्व केले होते. त्याने १ सामना जिंकला आणि २ पराभूत झाले.
विराट कोहलीने २०११ ते २०२३ दरम्यान सर्वाधिक १४३ सामन्यांत बंगळुरूचे नेतृत्व केले. तो ६६ सामने जिंकला, तर ७० पराभूत झाले. ३ सामने बरोबरीत सुटले.
डॅनिएल विट्टोरीने २०११-२०१२ दरम्यान २८ सामन्यात बंगळुरूचे नेतृत्व करताना १५ सामने जिंकले आणि १३ पराभूत झाले.
२००९ मध्ये केविन पीटरसनने ६ सामन्यात बंगळुरूचे कर्णधारपद सांभाळले होते. त्याने २ सामने जिंकले आणि ४ पराभूत झाले.
अनिल कुंबळेने २००९-२०१० दरम्यान ३५ सामन्यांमध्ये बंगळुरूचे कर्णधारपद सांभाळले. त्याने १९ सामने जिंकले आणि १६ सामने पराभूत झाले.
सर्वात पहिल्या आयपीएल हंगामात म्हणजे २००८ साली बंगळुरूचे नेतृत्व राहुल द्रविडने केले होते. त्याने १४ सामन्यात नेत्व करताना ४ सामने जिंकले, तर १० सामने पराभूत झाले होते.